पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे चरित्र म्हणजे तत्त्वनिष्ठेचे मूर्तस्वरूप ! --- लताआशाताई कोल्हटकर
।। जय श्रीराम ।। उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख वक्त्या आणि अन्य मान्यवर पुणे : दि २६ जानेवारी २०२५ विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि गोंडवनच्या महाराणी दुर्गादेवी यांच्या स्मरणार्थ महिलांचे मानवंदना संचलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, मातृशक्ती प्रांत संयोजिका प्रिया रसाळ, दुर्गावाहिनी संयोजिका सोनाली नाथ, माधवीताई सौंशी, ज्येष्ठ समुपदेशिका अर्चना देशपांडे, तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्र अभ्यासक लताआशाताई कोल्हटकर उपस्थित होते. २६ जाने रोजी, सायंकाळी ४ वाजता पुण्याच्या गंजपेठ येथील, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथून संचलनाला सुरुवात झाली. त्यानंतर --> महात्मा फुले वाडा --> मासे आळी --> मिठगंज पोलीस चौकी --> शितळादेवी चौक -->जैन मंदिर चौक --> सुभान शहा दर्गा चौक --> रांका ज्वेलर्स --> कस्तुरे चौक --> श्रमदान मारुती मंडळ --> क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम मार्गे पुन्हा ज्ञानज्योत...