भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्य. --- श्री. बजरंगलाल बागडा (आंतरराष्ट्रीय महामंत्री वि हीं प )
पुणे : दि. १४ जानेवारी २०२५रोजी, विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क विभाग आणि कोषाध्यक्ष श्री. रवींद्र नेर्लीकर यांच्या पुढाकारातून, पुणे शहरातील सनदी लेखापाल, कंपनी सचिव आणि कोस्ट अकौंटंट यांच्याशी संवाद साधण्यात आला.
या प्रसंगी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री बजरंगलालजी बागडा, क्षेत्र सहमंत्री श्री रामचंद्र रामुकाजी , प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, प्रांत कोषाध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, विशेष संपर्क विभाग प्रांत सदस्य श्रीकांत चिल्लाळ, तसेच अन्य प्रांत तसेच जिल्हा स्तरीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक मांडले ते म्हणाले; सी ए, सी एस, कॉस्ट अकौंटंट अशी आपणा सर्वांची श्रेणी ही समाजातील विशेष श्रेणी आहे. आपल्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेची माहिती ही समाजापर्यंत पोहोचावी या करता या संवाद सेतूचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे श्री किशोर चव्हाण यांनी विश्व हिंदू परिषदेच्या विविध कायमची तोंडओळख उपस्थितांना करून दिली.
त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना श्री बजरंगलालजी बागडा म्हणाले;
" मी स्वतः एक सनदी लेखापाल (सी. ए. ) आहे आणि त्यामुळे मी आपल्याशी एक व्यावसायिक मित्र या नात्याने बोलत आहे. आपण सारे भविष्याचा विचार करून आर्थिक नियोजन करणारे व्यावसायिक आहोत. त्यामुळे आपल्या देशाचा इतिहास, त्यावरील आक्रमणे, वर्तमान स्थिती आणि भविष्यात येणारी संकटे यांचा विचार करून आपल्याला आपले सामाजिक नियोजन देखील करावे लागणार आहे.
आपल्या देशावरील आणि विशेतः हिंदू संस्कृतीवर झालेल्या आक्रमणाचा इतिहास सांगताना बागडा यांनी अनेक ऐतिहासिक प्रसंग आणि घटना यांचा उहापोह केला. वर्तमान स्थिती मध्ये देशाच्या सीमावर्ती भागात होत असणाऱ्या धर्म परावर्तनाबद्दल माहिती देत असताना ही अशी धर्मपरिवर्तने ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
एकीकडे लव्ह जिहाद सारख्या अजगरी विळख्यामध्ये हिंदू युवती आणि महिलांना जखडले जात आहे, त्यातून त्यांचे धर्मांतरण केले जात आहे तर दुसरीकडे हिंदू धर्मियांना पाश्चिमात्य, भोगविलासी जीवनशैलीत गुंतवून त्यांचे मानसिक मतांतरण केले जात आहे, आत्ताच्या पिढीला धर्मापासून दूर नेले जात आहे.
या पूर्वी अनेक आक्रमणे होऊन देखील केवळ धर्मावरील निष्ठा आणि श्रद्धा यांच्या मुळे हिंदू समाज आजही अस्तित्वात आहे. परंतु सध्य स्थितीमधील आक्रमणे ही वेगळ्याच आणि विविध प्रकारची आहेत. थेट मैदानी युद्धे किंवा हल्ले न करता मानसिकतेवर परिणाम आणि हल्ले करण्याचा डाव खेळाला जातोय असेच वाटते. धर्ममतांतरीत झालेल्या समाजातून देशविरोधी कारवाया होताना दिसत आहेत.
एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या राज्याची मुसलमान प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे झालेली आजची स्थिती पाहता, आपल्या भावी पिढींसाठी केवळ संपत्ती ठेवणे गरजेचे नसून एक चांगला समाज मागे सोडून जाणे हे देखील आवश्यक आहे. आजचा इंग्लंड देश हा मुस्लिम बहुल नसला तरी आतून पोहकाराला गेला असल्याने, मुस्लिम प्रशासित बनला आहे. गोऱ्या युवती, महिला, मुली यांच्या शिलांचा अपहार होत असताना, तेथील राष्ट्राध्यक्ष हा मुस्लिम असल्याने या अत्याचाराला वाचाच फुटू शकत नाहीये.
आजचा विकसनशील भारत हा उद्याचा उध्वस्त इंग्लंड ठरू नये यासाठी, भावी पिढीच्या भविष्यासाठी, त्यांना हिंदू म्हणून सन्मानाने राहता यावे यासाठी विश्व हिंदू परिषद कार्य करत आहे.
आपणा सारख्या समाजातील महत्वपूर्ण व्यावसायिकांनी विश्व हिंदू परिषदेचे हात सर्वार्थाने बळकट करण्यासाठी जोडले जावे असेही आवाहन त्यांनी केले." यानंतर उपस्थितांनी आपल्या मनातील शंका विचारल्या आणि श्री बागडा यांनी शंकांचे निरसन केले.
प्रांत कोषाध्यक्ष श्री. रवींद्र नेर्लेकर यांनी आभार व्यक्त केले, तिळगुळ वाटप आणि चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन, प्रांत कार्यकारणी सदस्य श्री श्रीकांत चिल्लाळ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता, अनिकेत देशमुख, अनिकेत मुळ्ये, सागर देसर्डा , गणेश चव्हाण, विवेक गिरी यांनी परिश्रम घेतले.
वृत्तांकन :
श्रीपाद श्रीकांत रामदासी. ( प्रांत प्रमुख प्रचार विभाग :)
विश्व हिंदू परिषद प. महा. प्रांत
Comments
Post a Comment