मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने महिलांचे मानवंदना पथसंचलन.

 


                              पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना, मातृशक्ती आणि दुर्गवाहिनी संयोजिका

पुणे : शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५.

विश्व हिंदू परिषद मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने पुणे महानगर येथे रविवार दिनांक 26 जानेवारी दुपारी चार वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आणि राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीनिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी महिलांचे भव्य पथसंचलन. 

 विश्व हिंदू परिषद पुणे, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने गंजपेठ, पुणे येथे भव्य पथसंचलन करण्यात येणार आहे. 

या बद्दल माहिती देताना, मातृशक्ती संयोजिका प्रिया रसाळ, दुर्गा वाहिनी संयोजिका सोनाली नाथ, दुर्गावाहिनी शक्ती साधना प्रमुख समृद्धी सराफ यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मातृशक्ती संयोजिका प्रिया रसाळ म्हणाल्या, 

भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जन्माला तीनशे वर्षे पूर्ण होणार आहेत,त्यांनी आपल्या साठी केलेले कार्य आणि महिला म्हणून समाजकार्यात दिलेले योगदान ,मंदिराची,घाटाची स्थापना त्यांनी केली यातून  त्याची धर्माबाबत असणारे प्रेम,आणि त्याच्या हातात असणारे शिवलिंग हे सुध्दा आपल्याला त्याची श्रध्दा दर्शवते. 

यंदाच्याच वर्षी राणी दुर्गावती यांच्या जयंतीला पाचशे वर्षे पूर्ण होणार आहेत. राणी दुर्गावती या गोंडवणा क्षेत्राच्या राणी होत्या.  राणी दुर्गादेवी यांचा इतिहास झाशीच्या राणीप्रमाणे प्रतापवान आहे . 

त्या वीर रणागंना होत्या,त्यांनी अनेक वर्ष मुगघलाबरोबर लढा दिला अशा या धर्मरक्षक ,शासक, धाडसी, आणि समाजसेवक विरांगणाचा आदर्श समोर ठेवून त्याच्या कार्याला उजाळा देण्यासाठी तसेच ते संस्कार आपल्या भावी पिढीवर रुजवण्यासाठी त्याच प्रमाणे मुलींमध्ये शौर्यत्व निर्माण करण्यासाठी मानवंदना पथ संचलन रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी दुपारी चार वाजता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथून करण्यात येणार आहे. 

दुर्गावाहिनी प्रांत संयोजिक सोनाली नाथ म्हणाल्या, 

अश्याच प्रकारचे मानवंदना संचलन विश्व् हिंदू परिषद दुर्गावाहिनी मातृशक्ती च्या माध्यमातून देश भरात होतं आहे. 

यंदा 26 जानेवरी चे औचित्य साधून विश्व् हिंदू परिषद हे मानवंदना संचलन पुणे महानगर सावित्रीबाई फुले स्मारक येथे सायंकाळी 4:00 वाजता सुरु करणार आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या संपर्कामुळे आज पुणे महानगर व आजू बाजू च्या परिसरा मध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

संनचलन मध्ये सहभागी होणाऱ्या तरुणींसाठी पांढरा ड्रेस व भगवी ओढणी तर महिलांसाठी भगवी साडी असा वेष ठरवण्यात आला आहे. 

राष्ट्रीयत्वाचा मान राखणारा तिरंगा आणि परमपवित्र भगवा ध्वज जे हिंदुतवाचे प्रतीक आहे सोबत घेऊनच हे संचालन पार पडणार आहे.   संचलन झाल्या नंतर राष्ट्रीय वक्ता ह. भ. प . कृतिका दीदी कदम ह्या मार्गदर्शन करणार आहेत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ --> महात्मा फुले वाडा --> मासे आळी --> मिठगंज पोलीस चौकी --> शितळादेवी चौक -->जैन मंदिर चौक --> सुभान शहा दर्गा चौक -->  रांका ज्वेलर्स --> कस्तुरे चौक --> श्रमदान मारुती मंडळ -->  क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम मार्गे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे समारोप असा ३ किलोमीटर अंतर असणारा संचलन मार्ग आहे.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, विश्व हिंदू परिषदेची प्रांत कार्यकारणी, दुर्गावाहिनीच्या दुर्गा, मातृशक्तीच्या मातृ, पुणे पश्चिम आणि पुर्व विभागाचे पदाधिकारी, तसेच शहरातील असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. प्रांत मंत्री किशोर चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

 पुणे शहरामध्ये अश्या प्रकारचे हे बहुधा पहिलेच संचालन आहे. त्यामुळे स्त्रीशक्तीचा जागर आणि प्रदर्शन अनुभवण्याकरता पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संचलनात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले. 

द्वारा :

प्रचार प्रसिद्धी विभाग 

विश्व हिंदू परिषद - प. महा. प्रांत. 


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे चरित्र म्हणजे तत्त्वनिष्ठेचे मूर्तस्वरूप ! --- लताआशाताई कोल्हटकर

भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्य. --- श्री. बजरंगलाल बागडा (आंतरराष्ट्रीय महामंत्री वि हीं प )