भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्य. --- श्री. बजरंगलाल बागडा (आंतरराष्ट्रीय महामंत्री वि हीं प )
पुणे : दि . १४ जानेवारी २०२५ रोजी , विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क विभाग आणि कोषाध्यक्ष श्री . रवींद्र नेर्लीकर यांच्या पुढाकारातून , पुणे शहरातील सनदी लेखापाल , कंपनी सचिव आणि कोस्ट अकौंटंट यांच्याशी संवाद साधण्यात आला . या प्रसंगी , विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री बजरंगलालजी बागडा , क्षेत्र सहमंत्री श्री रामचंद्र रामुकाजी , प्रांत मंत्री किशोर चव्हाण , प्रांत सहमंत्री नितीन वाटकर , प्रांत कोषाध्यक्ष रवींद्र नेर्लीकर , विशेष संपर्क विभाग प्रांत सदस्य श्रीकांत चिल्लाळ , तसेच अन्य प्रांत तसेच जिल्हा स्तरीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते . प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक मांडले ते म्हणाले ; सी ए , सी एस , कॉस्ट अकौंटंट अशी आपणा सर्वांची श्रेणी ही समाजातील विशेष श्रेणी आहे . आपल्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेची माहिती ही समाजापर्यंत पोहोचावी या करता या संवाद सेतूचे आयोजन करण्यात आले आहे . त्याच प्रमाणे श्र...