मनामनांत झालेले भेद दूर करण्याचे काम सामाजिक समरसता -- किशोर चव्हाण
पुणे (दिनांक : ०९ जानेवारी २०२५) " मनामनांत झालेले भेद दूर करण्याचे काम सामाजिक समरसता ” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी सामाजिक समरसता अभियान यात्रेच्या माध्यमातून केले, आपल्या समाजाच्या दृष्टीने सामाजिक समरसतेचा विषय हा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा आहे ,समाजात समरसेतेचा विचार रुजावा समरसतेचा भाव यावा यासाठी विश्व हिंदू परिषद नेहमीच आग्रही व प्रयत्नशील आहे . समरसतेच्या कार्यात मानसिक परिवर्तन व्हावे यासाठी वैचारिक प्रबोधन सेवा, समन्वय व आवश्यक त्या ठिकाणी संघर्षाचा मार्ग असे या कार्याचे स्वरूप आहे .आज समरसता यात्रा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पवित्र स्मारकापासून प्रारंभ होत आहे,त्यांनी गंजपेठेतील तालमीच्या माध्यमातून चापेकर बंधू, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके ,महात्मा फुले असे अनेक क्रांतिकारक अन् नेते यांना प्रशिक्षण देऊन घडविले. क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी समाजासाठी आपले आयुष्य समर्पित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सामाजिक ऐक्यासाठी जी...